नागपूर | बहुचर्चित ग्रीन बससेवा अजूनही बंदच, गडकरींसोबतच्या बैठकीत तोडगा नाहीच

1,727 views · Published 24 August 2018 · 1:20 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केंद्रीय परवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बससेवा अद्यापही ठप्प आहे. यासंदर्भात गडकरींच्या उपस्थितीत आधी नागपुरात आणि त्यानंतर काल दिल्लीत एक बैठक झाली. मात्र बस सुरु होण्याबाबत कोणताही तोडगा निघाला नाहीय. गडकरींनी घेतलेल्या पुढाकाराची स्कॅनिया कंपनीने एक विशेष पत्रक काढून कौतुकही केलं. पण जोपर्यंत कंपनीच्या अटी पूर्ण होत नाही तोपर्यंत बसेस न चालवण्याच्या निर्णयावर कंपनी ठाम आहे. यासंदर्भात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय़ घेऊ असं कंपनीने म्हटल्याचं समजतंय. बससेवा चालविणाऱ्या स्कॅनिया कंपनीने दोन महिन्यापूर्वी अटींसदर्भात पत्र पाठवून महापालिकेला सुचित केले होते. दखल न घेतल्यास सेवा बंद करण्याचा इशाराही दिला होता. मात्र अधिकाऱ्यांनी या पत्रांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे प्रत्येकी एक कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या 25 ग्रीन बसेस उभ्या आहेत.

More from this channel