ब्रेकफास्ट न्यूज | दोनशे-दोन हजाराच्या खराब आणि फाटक्या नोटा बदलून मिळणार

4,722 views · Published 8 September 2018 · 0:38 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नव्याने चलनात आलेल्या नोटा फाटल्यास काय करावं, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आता मिटला आहे. दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा फाटल्यास बदलून मिळणार आहेत. अर्थ मंत्रालयाने खराब आणि फाटलेल्या नोटा बदलून देण्याबाबत 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नोटाबंदीनंतर देशात दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आली. त्यानंतर दोनशे रुपयांची नोटही रिझर्व्ह बँकेने चलनात आणली. मात्र या नोटा खराब झाल्या किंवा फाटल्या, तर बदलून मिळत नव्हत्या. कोणताच कायदा नसल्याने बँक नोटा बदलून देण्यास नकार देत होत्या. मात्र अर्थ मंत्रालयाने आता अशा नोटा बदलून देण्याच्या प्रस्तावाला संमती दिली. अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

More from this channel