ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरील रस्त्याला तडे
2,255 views · Published 10 July 2018 · 2:15 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सततच्या मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या साकेत पुलावर रस्त्याला तडे गेलेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ठाण्याकडे येणारी अवजड वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. मुंबई - नाशिक महामार्गावर ठाण्याच्या खाडीवर साकेत पूल आहे. या पुलावर नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर दोन गर्डरच्या मधोमध रस्त्याचा काही भाग काल मध्यरात्रीच्या सुमारास खचला आणि संपूर्ण रस्त्याला मोठा तडा गेला. या तड्यामुळे पुलाला काहीही धोका नसला, तरी अवजड वाहनांमुळे रस्ता ढासळण्याची भीती आहे. त्यामुळे या खचलेल्या भागावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पोलिसांनी अन्य मार्गाने वळवली आहे. तर रस्त्यावर काही भागात बॅरिकेड्स लावण्यात आल्यामुळे इतर वाहनांचाही वेग मंदावला आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल