मुंबई : राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांना ड्रेस कोड बंधनकारक

2,033 views · Published 6 August 2018 · 1:02 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा'अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शर्ट आणि फुल पॅन्ट, अॅप्रन, शूज बंधनकारक असणार आहेत. तर विद्यार्थिंनींना शर्ट, फुल पॅन्ट/साडी/सलवार कमीज, अॅप्रन, शूज बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता महाविद्यालय परिसरात शॉर्ट्स, स्कर्ट, हाफ पॅन्ट असे कपडे घालत येणार नाहीत. विद्यापीठाच्या विद्या परिषदेने हा निर्णय घेतला आहे. ड्रेसच्या रंग निवडीचे अधिकार महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. मात्र याबाबतची माहिती विद्यापीठाला देणे बंधनकारक असणार आहे.

More from this channel