लसीकरणानंतर नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू | वर्धा | एबीपी माझा

2,603 views · Published 4 November 2018 · 1:26 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

वर्ध्यातील सावंगी (मेघे) इथल्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा 'हिपॅटायटीस बी'च्या लसीकरणानंतर रिअॅक्शन झाल्याने मृत्यू झाला. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. हिमानी रवींद्र मलोंडे, असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. हिमानी ही सावंगी येथील राधिकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिंगची बी एससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना 'हिपॅटायटीस बी' ही लस देण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास दहा विद्यार्थिनींना रिअॅक्शन झाली. इतर विद्यार्थिनींच्या प्रकृती सुधारणा होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली, मात्र हिमानी मलोंडेची प्रकृती गंभीर झाल्यानं आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान आज पहाटे तिचा मृत्यू झाला.

More from this channel