कोर्टाकडून फटाक्यांवर मर्यादा, भाजपकडून आतषबाजी | मीरा-भाईंदर | एबीपी माझा

1,892 views · Published 29 October 2018 · 1:09 · Indexed 19 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

एकीक़डे सर्वोच्च न्यायालय प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजवण्यावर मर्यादा आणते, तर दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं मात्र शुल्लक कारणासाठी फटाके वाजवल्याचं समोर आलंय.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आज फटाके वाजवण्यात आले. 
स्थायी समिती सभापती आणि महिला बाल-कल्याण समिती सभापती यांच्या कार्यालयाचं आज उद्घाटन होतं. त्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. 
दरम्यान याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केलीये, तर फटाके फोडण्यात काहीही गैर नसल्याचं महापौरांचं म्हणणं आहे.

More from this channel