पुणे | अस्वच्छतेमुळे एफडीएची धाड, तरीही पुणेकर म्हणतात आम्हाला 'नो प्रॉब्लम'

4,781 views · Published 17 October 2018 · 3:49 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर एफसी रोडवरच्या रुपाली, वैशाली आणि कॅफे गुडलकचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. कारण, पुण्यात अत्यंत लोकप्रिय असणारी ही हॉटेल्स अत्यंत अस्वच्छ असल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पाहणीत आढळून आलंय.

अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडींमध्ये पुण्यातल्या लोकप्रिय हॉटेल्सचा ढिसाळ आणि गलिच्छ कारभार समोर आलाय. या हॉटेलमधल्या किचनमध्ये कचऱ्याचं साम्राज्य आढळून आलं. तसंच, या हॉटेलमध्ये शिळे पदार्थ वापरले जात असल्याचंही समोर आलंय.

More from this channel