ब्रेकफास्ट न्यूज | राष्ट्रवादीकडून 50-50 टक्के जागांचा फॉर्म्युला, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

3,658 views · Published 13 October 2018 · 0:44 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत. असं भाकित राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
भाजप आणि शिवसेना यांची फक्त लोकसभेसाठी युती होईल. विधानसभेसाठी ते एकत्र येणार नाहीत असंही पवारांनी सांगितलंय.
दरम्यान काल मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. यावेळी आगामी निवडणुकीत जिंकून येण्याच्या निकषावर जागावाटप होईल असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. तर ऑक्टोबर शेवटपर्यंत आघाडीची चर्चा पूर्ण होईल, असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
राज्यात 50-50 टक्के जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नसून काँग्रेसच्या निर्णयाची राष्ट्रवादी प्रतिक्षा करत आहे.

More from this channel