नवी दिल्ली | आधार कार्डबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल, कुठे कुठे आधार कार्ड लागणार?

4,169 views · Published 26 September 2018 · 1:31 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यापुढे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी आधारसक्तीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलंय. त्याच वेळी आधार’च्या बाबतीत नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी पुरेशी उपाययोजना असल्याचं आज सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटले आहे. ‘आधार’ कार्ड सर्वसामान्यांची ओळख असल्याचे कोर्टाने म्हटलंय. आणि आधार’च्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब केलंय. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने यावर निकाल दिला आहे. न्यायमूर्ती ए. के. सिकरी, न्यायमूर्ती. ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती अशोक भूषण यांचं या निर्णय़ावर एकमत होतं. तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड  यांनी काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला. त्यामुळे चार एक अशा बहुतानं आधारचा निर्णय झालाय

More from this channel