लखनऊ | भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखरची जेलमधून सुटका

2,384 views · Published 14 September 2018 · 0:43 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भीम आर्मीचा संस्थापक आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या दंगलीतील आरोपी चंद्रशेखर आझाद उर्फ रावणची तुरुंगातून सुटका झाली आहे. रात्री अडीचच्या सुमारास रावणला जेलमधून सोडण्यात आलं. योगी सरकारने बुधवारीच रावणला जेलमधून सोडण्याचा आदेश दिला होता. सहारनपूरमध्ये मे 2017 मधील जातीय दंगल भडकावण्याच्या आरोपात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (रासुका) बेड्या ठोकल्या होत्या. चंद्रशेखर 16 महिने जेलमध्ये होता. चंद्रशेखरच्या सुटकेच्या वेळी समर्थक मोठ्या संख्येने जेलबाहेर उपस्थित होते.

More from this channel