बुलडाणा | शेतकरी दाम्पत्याची विहिरीत उडी मारुन आत्महत्या
1,397 views · Published 7 September 2018 · 0:45 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बुलडाण्याच्या मोताळा शहरात एका शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे. घराशेजारील विहीरीत उडी मारत रमेश सावळे आणि विद्या सावळे यांनी जीवन संपवलं. काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या कुटुंबाकडे 3 एकर शेती आहे. सावळे कुटुंबावर कर्ज असल्याची माहिती आहे. मात्र कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असूनही याचा लाभ त्यांना मिळाला नव्हता. शिवाय बँकेकडून नवीन कर्जही उपलब्ध होत नव्हतं. यातूनच नवरा बायकोमध्ये वारंवार खटके उडत होते. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. या शेतकरी दाम्पत्याला 3 वर्षाचा मुलगा आहे. मोताळा परिसरात या घटनेमुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!