पिंपरी | हॉर्न वाजवल्याचं कारण, दुचाकीस्वारांची कारचालकाला दगडाने मारहाण

2,477 views · Published 5 October 2018 · 1:08 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरुन कारचालकाला दगडाने मारहाण केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. दुचाकीस्वारांनी पाठलाग करुन कारचीही तोडफोड केली. पिंपरीतील ताथवडे भागात बुधवारी रात्री हा प्रकार घडला. कारने जात असताना गजानन वीरकर यांनी हॉर्न वाजवला. त्यावेळी 'हॉर्न का वाजवतो' अशी दमबाजी दुचाकीस्वारांनी केली. मात्र वाद टाळण्यासाठी वीरकर तसेच पुढे निघाले. दुचाकीस्वारांनी वीरकरांच्या गाडीचा पाठलाग केला. गाडी अडवून त्यांना दगडाने मारहाण केली. इतकंच नाही, तर गजानन वीरकरांच्या कारच्या काचा फोडून आरोपींनी गाडीचं दारही चेपलं. यामध्ये वीरकर जखमी झाले आहेत.

More from this channel