ब्रेकफास्ट न्यूज : 'हॅम्लेट'विषयी नाटककार प्रशांत दळवींशी गप्पा

315 views · Published 19 May 2018 · 18:59 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपिअर या सर्वश्रेष्ठ नाटककाराचे ‘हॅम्लेट’ हे नाटक आता मराठी रंगभूमीवर अवतरलं आहे. झी ची निर्मिती असलेला मराठी रंगभूमीवरचा हा प्रयोग अनेक अर्थानं लार्जर दॅन लाईफ ठरला आहे. पण सध्या या चांगल्या कलाकृतीला वादाचं ग्रहण लागलंय. वीकएन्डला नाट्यगृहांच्या तारखा हॅम्लेटच्या नाट्यसंस्थेने सलग बुक केल्याने मराठी व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाने यावर आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केलीए. या वादातही हॅम्लेटला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद जराही कमी नाही. या नाटकाविषयी, या नाटकाच्या जन्माविषयी बोलण्यासाठी या नाटकाची रंगावृत्ती करणारे जेष्ठ नाटककार प्रशांत दळवी आज आपल्या सोबत आहेत

More from this channel