ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव कालवश | मुंबई | एबीपी माझा

1,900 views · Published 30 October 2018 · 3:29 · Indexed 10 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे त्यांनी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या देव यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपल्या लेखनकौशल्य आणि संगीत दिग्दर्शनाने अनेक वर्ष त्यांनी संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले.

More from this channel