अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
2,055 views · Published 12 May 2018 · 0:46 · Indexed 7 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दोन गटात झालेल्या वादात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. सध्या औरंगाबादेत जमावबंदी असून तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन औरंगाबाद पोलिस आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. काल संध्याकाळी मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी हवेत गोळीबार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे कसोशीनं प्रयत्न सुरु आहेत. काल संध्याकाळपासून मोतीकारंजा परिसरात वाद सुरु असल्यानं तणावाची स्थिती आहे. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार