712 | कापूस महामंडळ आणि जिनर्समधील वादामुळे कापसाची खरेदी लटकली

1,854 views · Published 19 October 2018 · 0:48 · Indexed 5 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

खरीपातील पिकांचा सध्या काढणीचा काळ सुरुये. काही पिकं विक्रीसाठी बाजारात आणली जातायत. त्यातील एक पीक म्हणजे कापूस. १ ऑक्टोबरपासून कापसाची खरेदी सुरु करु, असं आश्वासन सीसीआय म्हणजेच भारतीय कापूस महामंडळानं दिलं होतं. मात्र अजूनही म्हणावी त्या प्रमाणात खरेदी सुरु झालेली दिसत नाहीये. त्यातच कमी दर दिल्यानं जिनर्स आणि सीसीआयमध्ये वाद सुरु झालाय. जिनर्स असोसियेशननं प्रति गाठी १ हजार २५० रुपयांच्या दराची मागणी केली. पण सीसीआयनं या मागणीला नकार दिला. सीसीआयनं  प्रति गाठी ८६० रुपये दरानं खरेदी करण्याचं आश्वासन दिलं. मात्र जिनर्सनी हा दर मान्य केला नाही. कापूस महामंडळ आणि जिनर्समधील या वादामुळे कापूस खरेदी लटकल्याचं दिसून येतंय.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel