स्पेशल रिपोर्ट : शिमला : पर्यटकांनो, इथे येऊ नका, तहानलेल्या शिमलावासियांची विनंती
605 views · Published 2 June 2018 · 4:18 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
शिमलामधील पाणी संकट पाहता आता स्थानिक नागरिक पर्यटकांना शिमल्यात न येण्याची विनंती करत आहेत. पर्यटकांनी शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी जावं, कारण इथे पाण्याचा फारच तुटवडा आहे, अशाप्रकारच्या पोस्ट नागरिक सोशल मीडियावर करत आहेत. "शिमलामध्ये गरजेपुरतं लागणारं पाणीही उपलब्ध नाही. आंघोळीसाठीचं पाणी सोडाच पण पिण्यासाठीही आवश्यक पाणी मिळत नाही. शिमल्यात आम्हाला पाणी नाही. कृपया शिमल्यात न येता दुसऱ्या पर्यटन स्थळाला जावं," असं एकाने लिहिलं आहे. 25 हजार नागरिकांच्या हिशेबाने शिमला शहर वसवण्यात आलं होतं. शिमला नगरपरिषदेनुसार, शहराची लोकसंख्या आता 1.72 लाखांवर पोहोचली आहे. याशिवाय उन्हाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या एक लाखांपेक्षा जास्त असते. पर्यटकांची संख्या वाढल्याने इथे दरदिवशी 45 एमएलडी (मिलियन लिटर्स पर डे) पाण्याची मागणी वाढते. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी