पालघर : राजेंद्र गावितांच्या आश्वासनानंतर तारापूरमधील स्थानिकांचं आंदोलन मागे

1,099 views · Published 4 June 2018 · 1:11 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तब्बल 10 तासांच्या गरमागरमीनंतर पालघरच्या भूमीपुत्रांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय...खासदार राजेंद्र गावितांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी नमतं घेतलं...उद्या मुख्यमंत्री आणि तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक होणार आहे...तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात वेल्डर व फिटरच्या जागेसाठी मुलाखती घेण्यात आल्या.. या मुलाखतीत स्थानिक तरुणांसोबतच राज्याबाहेरी तरुणांनीदेखील मुलाखती दिल्या होत्या. मात्र  मुलाखतींमध्ये सर्व स्थानिक तरूणांना सरसकट नापास करण्यात आल्याचा आरोप होतोय.. बाहेरून आलेल्या तरूणांना मात्र तत्काळ नोकऱ्या देण्यात आल्याने स्थानिकामध्ये असंतोष भडकला....सकाळी 6 पासून स्थानिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं...दरम्यान या असंतोषानंतर नोकरी भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलीय..

More from this channel