ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : इंधन दरवाढीनंतर एसटीच्या तिकीट दरातही वाढ

608 views · Published 7 June 2018 · 0:45 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इंधन दरवाढीनंतर आता सर्व सामान्य नागरिकांना आणखी एक धक्का बसणार आहे. कारण सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी असणारी एसटी आपल्या तिकीटदरात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जूनपासून ही दरवाढ लागू होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. डीझेलचे वाढते दर आणि एसटी कर्मचाऱ्यांची नुकतिच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे तिकीटांच्या दरात वाढ केल्याचं महामंडळाने सांगितलं आहे. दरम्यान, ही दरवाढ नाईलाजास्तव करण्यात आल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. डिझेलवरील विविध कर माफ करण्याची मागणी  सरकारकडे केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास दरवाढीचा फेरविचार करण्यात येईल असंही रावतेंनी म्हटलं आहे.

More from this channel