लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम

4,484 views · Published 13 May 2018 · 1:47 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात ४५ जोडप्यांची लग्नगाठ बांधली. नाना पाटेकर यांनी या 45 मुलींचं कन्यादान केले. धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून लातूरचं ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात हा सामुहिक विवाह सोहळा रंगला. अशा सामूहिक सोहळ्यांमुळे शेतकऱ्यांचा भार हलका होऊन कर्ज काढण्याचा पायंडा बंद होई, असं मत नानांनी व्यक्त केलं. तर नाम फाउंडेशनकडून एक लाख रुपये प्रत्येक जिल्ह्याला देत असल्याचं मकरंद अनासपुरेंनी सांगितलं.

More from this channel