ब्रेकफास्ट न्यूज | नवी दिल्ली | काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एल्गार

430 views · Published 23 October 2018 · 0:29 · Indexed 6 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज काँग्रेस राजधानी दिल्लीमध्ये एक मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. सकाळी 11 वाजता जंतर-मंतर येथे विविध राज्यातील शेतकरी काँग्रेसच्या बॅनर खाली एकत्र होणार आहेत. तिथून नंतर संसदेवर घेराव मोर्चा काढला जाणार आहे. अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या आंदोलनाची माहिती पत्रकारांना दिली. देशभरातल्या 42 संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा असून विविध राज्यातील शेतकरी यात सहभागी होतील असाही दावा पटोले यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील या आंदोलनात काही काळासाठी हजेरी लावतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. मागच्या वेळी राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा आंदोलन धडकलं होतं तेव्हा मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालेला होता. त्यामुळे आजच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो आणि सरकार या आंदोलनाला कसा हाताळतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

More from this channel