तुलसी गबार्ड अमेरिकेच्या पहिल्या हिंदू अध्यक्षा ठरणार? | एबीपी माझा

647 views · Published 13 November 2018 · 0:45 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक हिंदू महिला राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. तुलसी गबार्ड असं त्यांचं नाव आहे. हवाई मतदारसंघातून चारवेळा सातत्याने निवडून आलेल्या तुलसी गबार्ड यांना त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षातही मानाचे स्थान आहे. त्यांचा जन्म हवाईमधून सिनेटर असणारे कॅथलिक वडील आणि कॉकेशियन समुदायाची आई अशा मिश्र दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. तुलसी यांनीही किशोरावस्थेतच हिंदू धर्म स्वीकारला. डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली तर त्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या पहिल्या हिंदू उमेदवार असतील. तसंच निवडून गेल्या तर पहिल्या महिला आणि सर्वात तरुण अध्यक्षा असतील. गेल्याच आठवड्यात त्या अमेरिकन प्रतिनिधीसभेत चौथ्यांदा निवडून गेल्या.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel