कोल्हापूर : पंचगंगा चोरीला गेली, हातकणंगलेकरांच्या तक्रारीमुळे पोलीसही अवाक्
843 views · Published 11 June 2018 · 0:58 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार हातकणंगले तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीचा विषय पाहून हातकणंगले पोलीस ठाण्यातील कर्मचारी अवाक् झाले. शंभरहून अधिक ग्रामस्थ पोहण्याचे साहित्य, मासेमारीची जाळी, डालगी घेऊन थेट पोलीस ठाण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. पंचगंगा नदी ज्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी हिरवं गवत उगवलं आहे. पाण्याने भरलेली आपली पंचगंगा चोरीला गेली, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तक्रारीचा विषय पाहून सुरुवातीला पोलीसही अवाक् झाले. त्यानंतर ही तक्रार दाखल होत नसल्याचं सांगताच ग्रामस्थ आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाली. दोन तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी ग्रामस्थांचा तक्रार अर्ज स्वीकारला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी