ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचा पट्टा तुटल्याने गोंधळ, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया

1,356 views · Published 12 May 2018 · 1:58 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

ठाणे रेल्वे स्थानकात नव्याने बसवण्यात आलेल्या सरकत्या जिन्यात शुक्रवारी रात्री अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि मोठा गोंधळ उडाला. या घटनेत सुदैवानं कुणाला फारशी इजा झालेली नसली, तरी सरकत्या जिन्यांच्या एकंदरीत अवस्थेवरुन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एखादी मोठी दुर्घटना होण्याची रेल्वे प्रशासन वाट बघतंय का? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर नव्यानंच सरकता जिना बसवण्यात आला आहे. या जिन्याचा पट्टा काल संध्याकाळी अचानक तुटला. गर्दीची वेळ असल्याने अनेक प्रवासी या सरकत्या जिन्यानं वर जात होते. मात्र अचानक पट्टा तुटल्याने जिना उलटा जातोय, अशी अफवा पसरली आणि मोठा गोंधळ उडाला.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

More from this channel