नागपूर : जय जवान, जय किसान संघटनेने शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतलं

1,411 views · Published 4 June 2018 · 1:07 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रीय किसान सभेच्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी नागपुरात शेतकरी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. इथे जय जवान, जय किसान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतमाल फेको आंदोलन करत सरकारचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांकडून दूध रस्त्यावर फेकण्याला पोलिसांनी विरोध केला. यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. तरीही शेतकऱ्यांनी पोलिसांच्या विरोधाला न जुमानता दूध रस्त्यावर ओतून दिलं.

More from this channel