ब्रेकफास्ट न्यूज : हार्ट अटॅकची माहिती मिळणार, आधीच उपचार घेता येणार!

731 views · Published 15 June 2018 · 1:15 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तुम्हाला हृदयविकाराची भीती वाटतेय? आता घाबरण्याची गरज नाही. कारण आपल्याला हृदयविकाराच्या धोक्याची पातळी कळणार आहे आणि त्यावर तातडीने उपचार घेणंही सोपं जाणार आहे. मुंबई आयआयटीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी यावर संशोधन करुन एक नवीन यंत्र बनवलं आहे. अवघ्या दीड हजारात हे यंत्र मिळू शकणार आहे. या यंत्राच्या मदतीने आपण आपलं एक थेंब रक्त देऊन आपल्याला ह्रदयविकारा संदर्भातील धोक्याची पातळी कळेल. बायोसायन्स आणि बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक सौम्य मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली देबास्मिती मोंडल आणि सौरभ अग्रवाल या दोन विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केलं आहे.

More from this channel