पुणे | पुण्यातील ब्लड बँकेने रुग्णासाठी एक्स्पायरी डेट संपलेलं रक्त दिलं
1,291 views · Published 19 October 2018 · 1:59 · Indexed 5 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुण्यातील ब्लड बँकेत जीवावर बेतणारी घटना समोर आलीय. मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेकडून एका रुग्णासाठी चक्क एक्स्पायरी डेट उलटून गेलेलं रक्त देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बारामतीच्या योगेश लासुरे यांची पत्नी दिपाली लासुरे यांना स्तनांचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्त देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर योगेश लासुरे हे मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेमध्ये पोहचले आणि त्यांनी पैसे मोजून रक्ताची पिशवी खरेदी केली. ती घेऊन ते पुन्हा हॉस्पिटलला आले. योगेश लासुरे यांनी ओम ब्लड बँकेतून आणलेल्या रक्ताच्या पिशवीवरील एक्स्पायरी डेट पाहिल आणि ते भडकलेच. कारण रक्ताच्या पिशवीवर 10 ऑक्टोबर 2018 ही एक्सपायरी डेट होती. आज 19 ऑक्टोबर 2018 ही तारीख आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हे रक्त योगेश लासुरे यांच्या पत्नीला देण्यास नकार दिला.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा