पतंजलीची दूरसंचार क्षेत्रातही एंट्री, भरघोस ऑफरसह नवं सिम लाँच
3,360 views · Published 28 May 2018 · 3:24 · Indexed 18 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने आता दूरसंचार क्षेत्रातही एंट्री केली आहे. बीएसएनएलसोबत भागीदारी करत पंतजलीने सिम कार्ड लाँच केलंय, ज्याला स्वदेशी समृद्धी सिम कार्ड असं नाव देण्यात आलं आहे. हे सिम सध्या केवळ पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध असेल. या सिमला 144 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. शिवाय या सिमधारकांना पंतजलीच्या वस्तूंवर दहा टक्के सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे सिमधारकांना अडीच लाख रुपयांचा वैद्यकीय विमा आणि पाच लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात येणार आहे. बीएसएनएल आणि पतंजली हे दोन्ही भारतीय ब्रँड आहेत. दोन्ही ब्रँडचं लक्ष्य देशाची सेवा करणं आहे. या सिमद्वारे केवळ डेटा आणि कॉलिंग सुविधाच नाही, तर वैद्यकीय सुविधा देणंही आमचं ध्येय आहे, असं रामदेव बाबांनी सांगितलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान