712 हवामानाचा अंदाज

1,210 views · Published 15 June 2018 · 0:39 · Indexed 16 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

हवामान विभाग, भेंडवळचं भाकीत, स्कायमेट सगळ्यांच्या अंदाजाप्रमाणे मान्सून वेळेत राज्यात दाखल झाला. कोकण-गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसानं एकाच दिवशी हजेरी लावली. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पावसानं मोठा खंड दिल्याचं दिसून येतंय. मान्सूनच्या पावसाचे ढग राज्यावरुन काहीसे दूर गेल्याचं या नकाशामध्ये दिसतंय. येते काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. तसच येत्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

More from this channel