नवी दिल्ली : हेडस्कार्फ घालण्याला विरोध, सौम्या स्वामीनाथन एशियन चेस चॅम्पियनशीपमधून बाहेर
588 views · Published 13 June 2018 · 1:38 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
इराणमधील एशियन टीम चेस चॅम्पियनशीप स्पर्धेतून भारतीय बुद्धिबळपटू सौम्या स्वामिनाथननं माघार घेतली आहे. इस्लामिक देश असणाऱ्या इराणमधील हमदान येथे एशियन टीम चेस चॅम्पियनशीप ही स्पर्धा होणार आहे. इराणमध्ये हेडस्कार्फ घालणं बंधनकारक आहे..आणि हाच नियम खेळाडूंवर लादला गेलाय..मात्र, हा नियम म्हणजे माझ्या विचार स्वातंत्यावर गदा आहे.. जबरदस्तीनं हेडस्कार्फ घालणं मान्य नाही, अशी पोस्ट सौम्यानं फेसबुकवर टाकली आहे.. सौम्या ही देशातल्या महिला बुद्धिबळपटूंमध्ये पाचव्या स्थानी तर जागतिक क्रमवारीत 97व्या स्थानी आहे... याआधी 2016 साली, भारतीय नेमबाज हीना सिद्धूनंही याच कारणामुळे इराणमध्ये आयोजित एशियन एअरगन स्पर्धेतून माघार घेतली होती...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी