नाशिक : सप्तश्रुंगी गडावरील ट्रॉलीचं काम पूर्ण, उद्घाटन मात्र रखडलं

1,977 views · Published 17 June 2018 · 0:45 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तश्रुंगी गडावर बसवण्यात आलेली प्युनिक्यूलर ट्रॉली अजूनही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. यापुर्वी अनेकदा ठरवून सुद्धा उद्घाटन मात्र होऊ शकलं नाहीये. आज छगन भुजबळ सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना उद्घाटनाला वेळ मिळत नसेल तर मग भुजबळांनीच ट्रॉलीचं उद्घाटन करावं अशी मागणी काही स्थानिक कार्यकर्तयांनी केलीये. यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटलंय. गेल्या सहा महिन्यांपासून ट्रॉलीचं काम पुर्ण होऊनही फक्त उद्घाटन न केल्यामुळे भाविकांना त्याचा लाभ मिळत नाहीये.

More from this channel