मुंबई : मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत, राहुल गांधींचं भाजपला आव्हान

941 views · Published 12 June 2018 · 1:13 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत कसे तरी वाचले, कर्नाटकात हरले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसणारही नाहीत, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले.

मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. भिवंडी कोर्टातील सुनावणीसाठी राहुल गांधी आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली.

More from this channel