712 हवामानाचा अंदाज

1,976 views · Published 16 June 2018 · 0:43 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेला आठवडाभर पावसानं ओढ दिल्यानंतर मान्सून आता दमदार कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याचं हवामान विभागाने सांगीतलंय. पावसानं ओढ दिल्यानं राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीही थांबवली होती. येत्या काही दिवसात पाऊस झाल्यास रखडलेली पेरणीही पूर्ण करता येणारेय. येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तेव्हा पेरणीची तयारी  पूर्ण करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलाय.

More from this channel