श्रीनगर : पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान शहीद

662 views · Published 3 June 2018 · 0:39 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जम्मू काश्मिरच्या अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे २ जवान शहीद झाले आहेत. यात ३ नागरिकही गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे.  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येतंय. रात्री १ च्या सुमारास जम्मू-काश्मिरच्या अखनूर सेक्टरजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने गोळीबार केला. भारतीय सुरक्षा दलांनीही याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू असल्याची माहिती आहे.

More from this channel