राज्यभरात उन्हाचा तडका, इंधनाचा भडका, सर्वसामान्य हैराण

382 views · Published 21 May 2018 · 0:46 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जून महिना काही दिवसांवर आलेला असला तरी राज्याचं तापमान मात्र अद्यापही कायम आहे. खासकरुन विदर्भातल्या सर्व शहरांमध्ये 40 डिग्रीच्या वर तापमान आहे. त्यामुळे मान्सून कधी दाखल होतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकीकडे तापमान 
वाढलेलं असताना दुसरीकडे इंधन दराचाही भडका उडाला आहे. काल पेट्रोलचे दर 33 तर डिझेल 26 पैशांनी वाढले. मागच्या सलग सात दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईतले इंधनाचे दर देशातल्या इतर महानगरांपेक्षा जास्त आहेत. तर महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये अनेक ठिकाणचे दर तर मुंबईहूनही अधिक आहेत.

More from this channel