चंद्रपूर : दादाजी खोब्रागडे यांचं निधन, वामनराव चटप यांची श्रद्धांजली
2,051 views · Published 3 June 2018 · 1:51 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
चंद्रपूर : देशातील तांदळाच्या नऊ जातींच्या संशोधनासाठी आपलं आयुष्य खर्ची करणारे दादाजी खोब्रागडे यांची आज चंद्रपुरात प्राणज्योत मालवली. पक्षाघात या दीर्घ आजाराने ते ग्रस्त होते. त्यांच्यावर चंद्रपुरातीलच खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. खोब्रागडेंवर उपचारासाठी कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणीही केली होती, मात्र राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर त्यांना सरकारने मदत देऊ केली. मात्र ही मदत वेळीच मिळाली असती, तर आज कदाचित खोब्रागडेंचे प्राण वाचले असते. खोब्रागडेंवर उद्या दुपारी चंद्रपुरातील नांदेड या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दादाजी खोब्रागडे यांनी एचएमटी या तांदळाच्या जातीचा शोध लावला. धानाची विविध वाणे विकसित करून त्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध केलं. त्यांच्या या अमूल्य कामगिरीसाठी एबीपी माझानेही शेती सन्मान या कार्यक्रमात खोब्रागडेंचा गौरव केला होता.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी