मुंबई : जे. जे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण

4,888 views · Published 19 May 2018 · 1:31 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई : डॉक्टरांवरील हल्ल्याची प्रकरणं सुरुच आहेत. रुग्णाच्या मृत्यूनंतर मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना नातेवाईकांकड़ून मारहाण  करण्यात आली आहे. तसंच रुग्णालयाची तोडफोडही केली.

जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सातच्या सुमारास दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 11 या सर्जरी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. या मारहाणीचा व्हिडीओ ही समोर आला आहे.

या प्रकरणी मुंबईच्या जे.जे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 353 आणि 332 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेडिकेअर कायद्यासोबतच आरोपींवर तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना म्हणजेच मार्डकडून दुपारी निषेध करण्यात आला. मारहाणीत जखमी झालेल्या एका डॉक्टरवर उपचार सुरु आहेत.

More from this channel