मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतूक मंदावली

2,754 views · Published 27 May 2018 · 0:36 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वीकेंड म्हटलं की वाहतूक मंदावलीच पाहिजे. आजही एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतूक मंदावली. वीकेंडमुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उन्हाळ्याची सुट्टी संपत आली आहे. त्यामुळे अनेक जण मे अखेर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबईहून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या दिशेनं जात आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वळणा-वळणाच्या बोरघाटात वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत आहे.

More from this channel