मुंबई | विलेपार्ले | विहिरीचा कठडा तुटल्याने महिला विहिरीत कोसळल्या

2,395 views · Published 2 October 2018 · 8:59 · Indexed 4 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या विहिरीत बुडून तीन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विश्वकर्मा समाजातील महिला भाविक पूजेनंतर विहिरीजवळ बसल्या असताना स्लॅब तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. विहिरीत पडलेल्या नऊ महिला आणि एका चिमुकल्याला वाचवण्यात यश आलं आहे.

विलेपार्ल्यातील शिवसागर हॉटेलच्या मागील भागात दीक्षित रोडवर असलेल्या विहिरीत ही दुर्घटना घडली. कुंकूवाडी भागात राहणाऱ्या विश्वकर्मा समाजातील महिला पूजेसाठी विहिरीजवळ असलेल्या देवळात गेल्या होत्या. पूजेनंतर महिला विहिरीजवळ बसल्या असताना संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास स्लॅब तुटला आणि 12 महिला आणि चिमुकला विहिरीत पडल्या.

उपस्थितांनी तात्काळ साड्या, ओढण्या यांच्या मदतीने काही महिलांना विहिरीतून बाहेर काढलं. अग्निशमन दलाचे जवान, महापालिका प्रशासन, पोलिस यांना स्थानिकांनी बचावकार्यात मदत केली. विहिरीतून तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाणी उपसल्यानंतर बचावकार्य थांबवण्यात आलं.

More from this channel