स्पेशल रिपोर्ट : नागपूर : भरउन्हात बैलाला गाडीला जुंपलं, नागपुरात दोघांवर गुन्हा

2,470 views · Published 12 May 2018 · 3:01 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विदर्भात तापमानाचा पारा 47 अंशावर पोहोचला आहे. या अशा उन्हात बैलाला गाडीला जुंपून त्यांच्याकडून मालवाहतूक करुन घेणाऱ्या दोघांवर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीपल फॉर अॅनिमल्सच्या सचिव करिष्मा गिलानी यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

करिष्मा गिलानी काल दुपारी नागपुरातून जात असताना आर मशिनवाल्यांचे लाकडे वाहून नेणाऱ्या बैलगाड्या दिसल्या. हिट वेव्ह असताना वेळ भर दुपारची एक वाजताची होती. भरउन्हात या बैलांच्या खांद्यावर भलं मोठं ओझं देण्यात आल्याचं पाहून करिष्मा गिलानी यांनी 100 क्रमांकावर फोन लावला आणि पोलिसात तक्रार दिली.

कोणती जनावरे किती माल वाहू शकतात, याबाबत कायदा आहे. या कायद्यानुसार जिथे तापमान 37 डिग्रीच्या वर असेल, तिथे दुपारी 12 ते 3 या वेळेत जनावरांचा मालवाहतुकीसाठी वापर करण्यावर बंदी आहे. मात्र हा नियम आपल्याला माहित नसल्याचं फगोराव दुर्गे आणि शेख सलील शेख युसूफ या दोन बैलगाडीमालकांचं म्हणणं आहे.

More from this channel