ब्रेकफास्ट न्यूज : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आजपासून संपावर

579 views · Published 13 June 2018 · 1:09 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आजपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे.

अचानक प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर जाणार असल्याने रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप कमी विद्यावेतन दिलं जातं. सर्वच राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 15 ते 30 हजारांपर्यंत स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन दिलं जातं. मात्र महाराष्ट्रात सर्वात कमी 6 हजार रुपयेच प्रशिक्षणार्थींना दिले जातात.

More from this channel