मुंबई: मुंबईसह देशभरात ईदचा उत्साह
450 views · Published 16 June 2018 · 2:29 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईद. भारतात शनिवारी ईद साजरी केली जाईल, अशी घोषणा दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम, इमाम बुखारी यांनी शुक्रवारी संध्याकाळी केली. शुक्रवारी रात्री 7.35 च्या सुमारास चंद्रदर्शन झाल्याचं इमाम बुखारी यांनी सांगितलं. ईद उल फित्रच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रीच देशातील प्रमुख बाजारांमध्ये गजबज पाहायला मिळाली. चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद साजरी करण्यात येण्याची घोषणा होताच, बाजारात लोकांची गर्दी वाढली. मुंबईसह देशभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या मिनारा मशिदीतही नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली. रमजान ईदची सुरुवात ईदच्या नमाजाने होते. सर्व मुस्लीम पुरुष नवे कपडे परिधान करुन ईदच्या नमाजासाठी ईदगाह किंवा मशिदीत जातात. नमाजानंतर लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी