खेळ माझा : प्रो कबड्डीतील यूपी योद्धाचा स्टार खेळाडू रिशांक देवाडिगाशी खास बातचित

2,665 views · Published 1 June 2018 · 1:12 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

प्रो कबड्डी लीगमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक बोली लागलेला रिशांक देवाडिगा हा महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू ठरला आहे. रिशांक देवाडिगाला यूपी योद्धानं एक कोटी ११ लाख रुपयांची बोली लावून आपल्याकडे कायम राखलं. मूळचा मुंबई उपनगरचा हा शिलेदार सध्या महाराष्ट्राचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रानं यंदा राष्ट्रीय कबड्डीचं विजेतेपदही पटकावलं होतं. या पार्श्वभूमीवर प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमात रिशांक देवाडिगावरचं अपेक्षांचं ओझं नक्कीच वाढणार आहे. त्या आव्हानाला रिशांक देवाडिगा कसा सामोरा जाणार, या प्रश्नाचं उत्तर आम्ही त्याच्याकडूनच घेतलं आहे. पाहूयात तो काय म्हणतो?

More from this channel