मुंबई | रेमंडच्या सिंघानिया पित्रा-पुत्रांमधील वाद टोकाला

2,247 views · Published 17 October 2018 · 0:52 · Indexed 5 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

रेमंड कंपनीचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचं मानद अध्यक्षपद काढून घेण्यात आलंय.. तरी, मुलगा गौतम सिंघानिया यानं हे मुद्दामून केल्याचा आरोप विजयपत सिंघानिया यांनी केलाय.. तर, गौतम सिंघानिया यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे... मानद अध्यक्षपदावरुन विजयपत सिंघानिया यांना हटवण्याचा सर्वस्वी निर्णय रेमंड कंपनीच्या बोर्ड पदाधिकाऱ्यांनी घेतलाय.. त्यांच्या निर्णयाशी माझा कसलाही संबंध नाही, असं स्पष्टीकरण गौतम सिंघानिया यांनी दिलंय. दुसरीकडे कंपनीला लिहिलेल्या पत्रांमध्ये सिंघानियांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरली आहे.. तर सिंघानिया कंपनीच्या डायरेक्टर्सला गेले काही दिवस अत्यंत वाईट वागणूक देत असल्यामुळे विजयपत सिंघानिया यांच्याकडून हे पद काढून घेतलं असल्याचा खुलासा रेमंडच्या वतीने करण्यात आला आहे.

More from this channel