UNCUT : नागपूरच्या रेशिमबागेतील सरसंघचालक मोहन भागवतांचं संपूर्ण भाषण
1,080 views · Published 7 June 2018 · 32:57 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
प्रणव मुखर्जींसाठी पहिल्यांदाच संघाच्या परंपरेला छेद देण्यात आला. दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आधी भाषण करतात, त्यानंतर सरसंघचालकांचं संबोधन होतं. मात्र यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आधी भाषण केलं, तर शेवटी प्रणव मुखर्जींनी उपस्थितांना संबोधित केलं. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण का दिलं, ते त्यांनी का स्वीकारलं, यावरुन वाद निर्माण करणं निरर्थक असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं. दरवर्षी देशातील सदगृहस्थांना संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं जातं. त्यामुळे संघाच्या परंपरेला अनुसरुनच प्रणव मुखर्जींसारख्या सदगृहस्थांना निमंत्रण दिल्याचं भागवतांनी स्पष्ट केलं. संघ सर्वांना जोडणारी आणि लोकशाही विचार मानणारी संघटना असल्याचं सांगतानाच संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले होते, अशी आठवणही भागवतांनी करुन दिली. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी