नवी दिल्ली : वाजपेयींची प्रकृती स्थिर, मोदी, शाह आणि राहुल गांधी भेटीला एम्समध्ये

2,502 views · Published 11 June 2018 · 3:10 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती ,स्थिर असल्याची माहिती एम्स रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिलीए.. मात्र अजूनही वाजपेयींवर उपचार सुरु आहेत.. 
दरम्यान आज संध्याकाळपासून वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी नेतेमंडळी एम्स रुग्णालयात दाखल झाले... काँग्रेस अध्य़क्ष राहुल गांधींनी वाजपेयींची भेट घेतली. त्यानंतर भाजपच्या दिग्गज मंडळींच्या भेटीचा सिलसिला सुरु झाला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी एम्समध्ये वाजपेयींची भेट घेतली... पंतप्रधान मोदी जवळपास 55 मिनिटे एम्समध्ये होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही अटलजींच्या जावयांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली...यावेळी एम्स रुग्णालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

More from this channel