मुंबई : आयपीएल बेटिंगमध्ये अरबाजपाठोपाठ दिग्दर्शक साजिद खानचाही सहभाग?
1,005 views · Published 5 June 2018 · 2:06 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ठाणे खंडणीविरोधी पथकाने उघड केलेल्या आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खाननंतर आणखी काही सेलिब्रेटींची नावं समोर येत आहेत. दिग्दर्शक, अभिनेता साजिद खानही बेटिंग प्रकरणात अडकण्याची चिन्हं आहेत. सात वर्षांपूर्वी साजिद खानने आपल्या माध्यमातून क्रिकेटवर बेटिंग केल्याची माहिती अटकेत असलेला बुकी सोनू जालान याने दिली आहे. त्यामुळे बेटिंगचं बॉलिवूड कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. आयपीएल बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून अटकेत असलेला बुकी सोनू जालान याची कसून चौकशी सुरु आहे. सोनू जालानने साजिदची माहिती पोलिसांना दिल्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणात साजिद खानला लवकरच चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी