नवी दिल्ली | गांधी कुटुंब कमिशनशिवाय जगू शकत नाही, राहुल गांधींच्या आरोपाला भाजपकडून प्रतिउत्तर

1,029 views · Published 25 September 2018 · 2:45 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर दिवसेंदिवस टीका करण्याचं सत्र सुरुच आहे... भ्रष्टाचाराविरोधात लढाय़ला आलेल्यानंच अनिल अंबानींना 30 हजार कोटी रुपये दिले.. राफेल, विजय माल्ल्या, ललित मोदी, नोटबंदी आणि जीएसटी अशा सर्व कामांमध्ये मोदींनी चोरी केलीय... आणि त्या सर्व चोऱ्या आम्ही एक-एक करुन जनतेला दाखवू की मोदी हे चौकीदार नाहीत, तर चोर आहेत, अशा भाषेत राहुल गांधींनी मोदींवर घणाघात केलाय...  काल अमेठीतल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते... तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या आरोपाला भाजपकडून प्रतिउत्तर मिळालं आहे. बोफोर्स प्रकरणाचा दाखला देत गांधी कुटुंब हे कमिशनशिवाय जगूच शकत नाही. असा आरोप भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केलाय.

More from this channel