यवतमाळ | जिल्ह्यात अतिवृष्टीने 937 घरांची पडझड

4,267 views · Published 17 August 2018 · 0:39 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने 937 घरांची पडझड झालीय. त्यामध्ये दिग्रस तालुक्यातील 400, महागाव तालुक्यातील 251, उमरखेड तालुक्यातील 100 घरांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पुराच्या पाण्यात 29 जनावरं देखील वाहून गेलीत. दिग्रस शहरात काल एकुण 210 मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे अडाण प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. हवामान विभागाच्यावतीने अनेक गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 
    दरम्यान या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिले आहेत.

More from this channel